नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, पार्क केलेल्या मालट्रकसह चोरट्यांनी वेगवेगळया भागातून दोन दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी नाशिकरोड,पंचवटी व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिंदे ता.जि.नाशिक येथील आण्णा संतोष खरात (रा.साईराज कॉलनी,शिंदे) यांच्या मालकिचा आयशर मालट्रक एमएच ४७ वाय ६४०१ गेल्या १ ऑगष्ट रोजी रात्री त्यांच घरासमोरील मैदानात पार्क केलेला असतांना तो चोरट्यांनी चोरून नेला. सर्वत्र शोध घेवूनही तो मिळून न आल्याने खरात यांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.
मोटारसायकल चोरीची पहिली घटना पंचवटीत घडली आदित्य राजेंद्र नवले (रा.खेडगाव ता. दिंडोरी) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे नवले शनिवारी (दि.१६) शहरात आले होते. पंचवटीतील सात्वीक लॉज समोर पार्क केलेली त्यांची एमएच १५ एचटी ७२३७ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.
दुसरी घटना जिल्हा रूग्णालयात घडली. स्वाती रामचंद्र काळे (रा.गुलमोहर कॉलनी ध्रुवनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. काळे यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफपी ९३२० गेल्या गुरूवारी (दि.१४) सिव्हील हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार आहिरे करीत आहेत.