नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सायबर भामट्यांनी शहरातील तरूणास साडे सात लाख रूपयांना ऑनलाईन चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टॉक ट्रेंडिग आणि आयपीओ अलॉटमेंटमधून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतील ३५ वर्षीय युवकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात भामट्यांनी युवकाशी मोबाईलवर संपर्क साधला होता. ९१९६९७३९१३९३ या मोबाईलधारकाने तरूणास आपल्या एसएमसी ग्लोबल सेक्युरिटी १६ या व्हॉटसअप ग्रुपमध्ये समावेश करून घेतला. या ग्रुपमध्ये एसएमसी ब्रोकर कंपनीचे नाव वापरून एसएमसी ग्लोबल सिक्युरिटी नावाच्या मोबाईल अॅप मधुन अप्पर व लोअर सर्किट स्टॉक ट्रेंडिग आणि आयपीओ अलॉटमेंट मधून गुंतवणुकावीर अल्पावधीत जास्त नफा असे आमिष दाखविण्यात आल्याने ही फसवणुक झाली.
युवकाचा विश्वास बसताच संशयितांनी विविध बँक खात्यात त्यास ७ लाख ५६ हजार ७०९ रूपयांचा भरणा करण्यास भाग पाडले असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.