नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात एकटी असल्याची संधी साधत एका विवाहीताने १४ वर्षीय मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार माडसांगवी (ता.जि.नाशिक) येथे घडला. मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टकल्या उर्फ बाळू (४५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित मुलीचे कुटुंबिय माडसांगवी शिवारात राहतात. मोलमजूरी करणारे आई वडिल कामावर जात असल्याने मुलगी घरात एकटी राहयची. गेल्या वर्षी अनोळखी संशयिताने मुलीचे घर गाठून कुणी नसल्याची संधी साधत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.
या घटनेची वाच्यता केल्यास कुटूंबियास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मुलीने याबाबत कुणास काही सांगितले नाही. त्यानंतर त्याने नित्यनेम घरी येवून मुलीवर अत्याचार केला. या घटनेत मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.