नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर रोडवरील उच्चभ्रू लोकवस्तीत राहत असलेल्या पत्नीचा मानसीक व शारीरिक छळ करत बंदुकीचा धाक दाखवून सुमारे ७५ लाख रूपये परस्पर वर्ग करुन घेतल्याची फिर्याद दाखल झाली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात पती आदीत्य कासार सह कुटुंबीयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गंगापूर रोड परिसरात उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या पती आदित्य कासार, सासू जया कासार, सासरे पांडुरंग कासार, नणंद गौरी कासार, नणंद सौ. शर्वरी कोतवाल, नंदोई तुषार कोतवाल यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, सर्वांकडून सुमारे २०१६ पासून वारंवार मानसिक व शारिरीक छळ करून पीडितेला बंदुकीचा धाक दाखवून व जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पीडितेचे वडील मयत झाल्याने तिला कोणाचाही आधार नाही याचा गैरफायदा घेत पती व सासरकडच्या लोकांनी धमकी देऊन सुमारे ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वर्ग करून घेत छळ केला व पीडितेचे सर्व दागिने व स्त्रीधन काढून घेतले. अशी फिर्याद सदर पिडीतेने पती व इतरांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केलेली असून भारतीय न्याय संहिता कलम ८५, ३१६ (२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) सह ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या फिर्यादी मध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत.
विशेष म्हणजे सदरच्या पीडितेचा पती हा सातपूर एमआयडीसी परिसरातील एक हॉटेल चालवीत असून पीडितेचे सासरे सेवा निवृत्त सरकारी अधिकारी व पिडीतेची सासू नाशिक मधील एका नामांकित शाळेची सेवानिवृत्त शिक्षिका आहे. सदरच्या प्रकरणाचा तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.