नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अॅडमिन पासवर्डचा वापर करून एकाने एसबीआयच्या एटीएममधील सव्वा चार लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषीकेश जयवंत जाधव (रा.संसरीगाव दे.कॅम्प) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत निकीता अबुज यांनी फिर्याद दिली आहे. राजीवनगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये गेल्या २६ ऑगष्ट रोजी हा प्रकार घडला. संशयित हिताची कॅश मॅनेजमेंट सर्व्हीसेस प्रा.लि. कंपनीमध्ये कार्यरत होता.
एटीएममध्ये भरण्यासाठी दिेलेल्या रकमेतील ४ लाख १५ हजार ३०० रूपयांचा त्याने अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताने अॅडमिन पासवर्डचा वापर करून एक्सीस कॅशचा बहाणा करून सदरची रक्कमेचा अपहार केला असून अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.