नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विधानसभा निवडणुकीचा निवडणूक खर्च सादर केला नाही. या कारणावरून कुरापत काढून पूर्व विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने आपल्या तिघा साथीदारांसह आडगाव शिवारातील महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या मनसेच्या जिल्हा सचिवाच्या घरी जाऊन शिवीगाळ दमदाटी करत घरातील लॉकर मधून जबरीने ९ लाख ५९ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम बळजबरीने लुटून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये थेट प्रादेशिक पक्षाच्या विधानसभा उमेदवारावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि योगेश नाना पाटील, २८, रा. महालक्ष्मी नगर, आडगाव शिवार, नाशिक यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी आणि मनसे विधानसभा उमेदवार प्रसाद (बाळासाहेब) दत्तात्रय सानप आणि त्याचे साथीदार उमाकांत एगडे, नितीन घुगे, संकेत मोहिते यांच्या विरोधात जबरी लुटीचा गुन्हादाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनसेचे उमेदवार सानप यांनी पाटील यांची महापालिका व विधानसभा निवडणुक आयोगाच्या परवानगीसाठी पाटील यांची निवडणूक प्रतिनिधी म्हणून
नियुक्ती केली होती. तसेच, या कामाचा मोबदला म्हणून पाटील याला काही रक्कम देखील देण्यात आली होती. दरम्यान सानप यांनी पाटील याला तुला मोबदला म्हणून दिलेली रक्कम मनपा परवानगीसाठी वापर आपण तुझ्या मोबदल्याचे नंतर बघू असे सांगितले. त्यावर पाटील याने सदर रक्कम वापरण्याससांगितले. त्यावर पाटील याने सदर रक्कम वापरण्यास
नकार देऊन मला तुमचे काम करता येणार नाही. तुमचे पैसे परत देतो असे सांगितले व ते निवडणूक खर्च सादर करण्यासाठी गेले नाही. याचाच राग आल्याने शुक्रवार दि. ८ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित प्रसाद सानप त्याचे साथीदार उमाकांत एगडे, संकेत मोहिते आणि नितीन घुगे असे चौघेजण पाटील याच्या घरी आले. त्यावेळी संशयितांनी पाटील याला धमकी देत तू निवडणूक खर्च देण्यासाठी का गेला नाही असे म्हणत आत्ताच्या आत्ता पैसे दे अशी मागणी केली. त्यावेळी पाटील यांनी पैसे देण्यासाठी वरच्या मजल्यावर असलेले लॉकर उघडले असता संशयितांनी लॉकरमधील ८ लाख ८४ हजार रुपयांची रोकड आणि आईची ७५ हजार रुपये किंमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत असा एकूण ९ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल सानप यांनी बळजबरीने हिसकावून घेतला. तसेच, सानप याने आम्ही गिरीष महाजन यांना नडू शकतो तर तू कोण आहे. असे म्हणत तुझ्या बहिणीच्या घरी गोंधळघालण्यासाठी उद्या मुले पाठवतो अशी धमकी दिली तसेच, घरातील आधार कार्ड, पॅन कार्ड व डेबिट कार्ड घेऊन निघून गेले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मयूर निकम तपास करत आहे.