नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक : माहेरी आलेल्या गुजरातस्थीत महिलेच्या क्रेडिट कार्डचा भामट्यांनी वापर करून परस्पर खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत आरबीएल बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ३५ हजाराची फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किर्ती शरद पाटील (रा.बडोदरा,गुजरात) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील या गेल्या जून महिन्यात शहरात माहेरी आल्या होत्या. पंचवटीतील सुदर्शन कॉळनी भागात त्या वडिलांच्या घरी असतांना भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी कुठलीही गोपनीय दिली नसतांनाही भामट्यांनी त्यांच्या आरबीएल बँकेच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ही फसवणुक केली आहे. या घटनेत भामट्यांनी पाटील यांच्या क्रेडीट कार्डचा वापर करून परस्पर खरेदी केल्याचा प्रकार समोर आला असून अधिक तपास निरीक्षक ज्योती आमणे करीत आहेत.









