सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

९० हजाराचे गळयातील सोन्याचे अलंकार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले…रवी शंकर मार्गावरील घटना

by India Darpan
नोव्हेंबर 6, 2024 | 2:32 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणा-या महिलेच्या गळयातील सोन्याचे अलंकार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना रवी शंकर मार्गावरील अर्णेश्वर महादेव मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधा रमेश जोंधळे (रा.नेहा पार्क जवळ,टागोरनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जोंधळे या गेल्या शनिवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी परिसरातील रविशंकर मार्ग भागात गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. अर्णेश्वर महादेव मंदिराजवळून त्या पायी जात असतांना अ‍ॅक्टीव्हावर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील मंगळसूत्र, बोरमाळ व शॉट पोत असे सुमारे ९० हजार रूपये किमतीचे दागिणे हिसकावून नेले. अधिक तपास पोलीस नाईक भामरे करीत आहेत.

रोकडसह दोन मोबाईल चोरून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उघड्या घरात शिरून चोरट्यांनी रोकडसह दोन मोबाईल चोरून नेल्याची घटनाजुना कुंभारवाडा भागात घडली. या घटनेत सुमारे २० हजाराच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद त्र्यंबक शिंदे (रा.भंडारी बाबा मंदिराजवळ,काझीगढी) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे कुटुंबिय सोमवारी (दि.४) रात्री उकाड्यामुळे नेहमी प्रमाणे दरवाजा उघडा ठेवून झोपी गेले असता ही घटना घडली. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला. घरात शिरलेल्या भामट्याने कपाटातील पाच हजाराची रोकड तसेच वरिल मजल्यावर शिलाई मशिनवर ठेवलेले दोन मोबाईल असा सुमारे २० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार बोंबले करीत आहेत.

बसप्रवासात महिलेच्या पर्समधील १६ हजाराची रोकड चोरट्यांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बसप्रवासात महिलेच्या पर्स मधील रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार द्वारका ते सिन्नर फाटा दरम्यान घडला. या घटनेत भामट्यांनी १६ हजाराची रोकड लांबविली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिनाबाई अशोक सोनवणे (रा.खापरेमळा,सिन्नरफाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे या रविवारी (दि.३) कामानिमित्त शहरात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या सिटीलिंक बसमधून परतीचा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. द्वारका सर्कल ते सिन्नर फाटा दरम्यानच्या प्रवासात अज्ञात चोरट्याने बसमध्ये असलेल्या गर्दीची संधी साधत सोनवणे यांच्या पसर्मधील १६ हजाराच्या रोकडवर डल्ला मारला. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाची तीन प्रकाशने प्रकाशित

Next Post

शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी वडिलांनी ठेवले आहे, यासंदर्भात मी कोणाचाही आदेश मानणार नाही…उध्दव ठाकरे

India Darpan

Next Post
Untitled 18

शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी वडिलांनी ठेवले आहे, यासंदर्भात मी कोणाचाही आदेश मानणार नाही…उध्दव ठाकरे

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011