नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरात साफसफाईसह धुनी भांडी करणा-या कामगार महिलेने आपल्या मालकाच्या घरातील रोकडसह दागिण्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दहा हजाराच्या रोकडसह सोनसाखळी भामट्या महिलेने पळविली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विजया ठाकूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत गौरव नथू कांबळे (रा.सम्राट गोकुळधाम,कमलनगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित महिला कांबळे यांच्याकडे साफसफाईसह धुनी भांडीचे काम करते. भाऊबिज निमित्त रविवारी (दि.३) कांबळे दांम्पत्य अल्पावधीसाठी घराबाहेर पडले असता ही चोरी झाली.
संशयित महिलेने घरात कुणी नसल्याची संधी साधत बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या पर्स मधील ९ हजार ६०० रूपयांची रोकड व पेंडल असलेली सोनसाखळी असा सुमारे ३९ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज लांबविल्याचा आरोप करणयत आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
…….