नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) कारची काच फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली. या घटनेत डॅश बोर्डच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेल्या दोन लाख १० हजाराच्या रोकडवर भामट्यांनी डल्ला मारला असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण बाबासाहेब बडे (रा.नवश्या इलाईट सोसा.नवश्या गणपती मंदिराजवळ,आनंदवली) यानी फिर्याद दिली आहे. बडे गेल्या गुरूवारी (दि.३१) पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पैसे काढून ते घरी परतले होते. अल्पावधीसाठी ते घरात गेले असता ही घटना घडली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या एमएच १५ ईपी ४३३३ या स्विफ्ट कारच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी डॅश बोर्ड ड्राव्हरमध्ये ठेवलेली दोन लाख १० हजाराची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.
दुचाकी अडवित दोघांनी तरूणास लुटले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकी अडवित दोघांनी तरूणास लुटल्याची घटना जेलरोड भागात घडली. या घटनेत तोंडावर फायटरने मारत भामट्यांनी युवकाच्या खिशातील तीन हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमेध सपकाळ व मंथन मोरे अशी तरूणास लुटणाºया संशयितांची नावे आहेत. याबाबत जय कैलास तेलोरे (१९ रा.सम्राट अशोकनगर दसक जेलरोड) या युवकाने फिर्याद दिली आहे. तेलोरे शनिवारी (दि.२) दुपारच्या सुमारास अशोकनगर येथील सायट्रीक कंपनी परिसरातून दुचाकीवर आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. परिचीत संशयितांनी दुचाकी अडवित तेलोरे याच्याकडे पैश्यांची मागणी केली. यावेळी तेलोरे याने पैसे देण्यास नकार देताच संशयितांपैकी एकाने त्याच्या तोंडावर फायटर मारून जखमी केले तर दुसºयाने खिशातील तीन हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत दोघांनी पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.