नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जमिन विकसकाने वृध्देची सव्वा ३६ लाख रूपयांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यस्थितींशी संगनत करून विकसकाने बांधकाम अपूर्ण सोडल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत बाळासाहेब कुमावत (रा.प्रणव मार्केट,जत्रा हॉटेल ), अश्विनी कुमावत व शरद कुमावत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यातील अनिकेत कुमावत हा जमिन विकासक आहे.
याबाबत रेखा पंडितराव शिरसाठ (६७ रा.तिडके कॉलनी,उंटवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अश्विनी व शरद कुमावत यांच्या माध्यमातून २०२० मध्ये शिरसाठ यांची अनिकेत कुमावत याच्याशी ओळख झाली होती. शिरसाठ यांच्या मालकिचा आडगाव शिवारातील गट नं. ५५१ -१ पैकी प्लॉट नंबर ४ क्षेत्र २५५ हा भूखंड डेव्हलप करण्याची चर्चा झाल्याने ही फसवणुक झाली. सदर भूखंडावर बांधकाम करून चांगला नफा मिळविण्याचे आमिष दाखविण्यात आल्याने शिरसाठ व कुमावत यांच्यात रो हाऊस बांधकामाचा विकसन करारनामा करण्यात आला. भागीदारीत हा व्यवसाय करण्याचे ठरल्याने शिरसाठ यांच्याकडून ३६ लाख २१ रोकड उकळण्यात आली.
त्यानंतर या ठिकाणी तीन रो हाऊसचे बांधकाम सुरू करण्यात आले असून संबधीताने गेल्या दोन वर्षांपासून दांम्पत्याशी संगनमत करीत काम बंद ठेवल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत.