नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी भद्रकाली,अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात गुह्याच्या नोंदी करण्यात आल्या असून चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तळेगाव अंजनेरी ता.जि.नाशिक येथील शिवाजी काशिनाथ निंबेकर गेल्या बुधवारी (दि.२३) कामानिमित्त शालिमार भागात आले होते. कालिदास कला मंदिर परिसरातील मोकळया मैदानावर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ डीवाय ४६६१ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील राणेनगर भागात घडली. पंकज रामनाथ कासार (रा.सप्तशृंगी मदिराजवळ,लोकमान्यनगर पवननगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कासार बुधवारी रात्री राणेनगर येथील चौपाटी भागात गेले होते. वक्रतुंड पार्सल पॉईंटच्या बाजूला त्यांनी आपली एमएच १५ डीआर ०५४६ मोटारसायकल पार्क केली असता ती चोरट्यानी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देसले करीत आहेत.
तिसरी घटना औद्योगीक वसाहतीतील कार्बननाका भागात घडली. नवल गुलाब मोहाडकर (रा.अशोकनगर,सातपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोहाडकर यांची अॅक्टीव्हा एमएच १५ जीजी ७९९२ गेल्या शनिवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास कार्बननाका परिसरातील म्हसोबा मंदिराशेजारी लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.
…….