नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरूणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणात तरूणी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून संशयिताने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने तरूणीने सातपूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.
राहूल रविंद्र खरात (२५ रा.अशोकनगर, सातपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित आणि पीडिता एकाच भागातील रहिवासी असून त्यांच्यात २०१६ पासून प्रेमसंबध आहेत. युवती अल्पवयीन असतांना संशयिताने लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
यानंतरही हा प्रकार सुरूच राहिल्याने तरूणी गर्भवती राहिली. यातून युवतीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने लग्नास नकार देऊन तिला मारहाण करीत जीवे ठार माण्याची धमकी दिल्याने तिने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भडांगे करीत आहेत.
………..