रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दोन घरफोडीत चोरट्यांनी साडे तीन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

by India Darpan
ऑक्टोबर 21, 2024 | 3:59 pm
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीची मालिका सुरू असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात भरदिवसा झालेल्या एका घरफोडीचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर व गंगापूर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.

आनंदवली शिवारात राहणा-या पल्लवी किशोर पवार (रा.ऋषिकेश मोणार्क अपा.नवश्या गणपती) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पवार कुटुंबिय दि.१२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान बाहेर गावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ७० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ६२ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.

दुसरी घटना इंदिरानगर येथील चार्वाक चौक भागात घडली. कविता योगेश काळे (रा.लक्ष्मण अपा.बापू बंगला,सुपर ग्राहक मॉल जवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. काळे या बुधवारी (दि.१६) सकाळी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसात त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड, मोबाईल व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४४ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उजाड माळरानावर फुलाविले नंदनवन… मुलुख फार्मने दिली दहिटने गावाला ओळख

Next Post

परिवर्तन महाशक्तीच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर…नाशिक जिल्ह्यातून यांना मिळाली संधी

Next Post
Untitled 67

परिवर्तन महाशक्तीच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर…नाशिक जिल्ह्यातून यांना मिळाली संधी

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011