नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंदी असलेल्या गोमांसाची राजरोसपणे शहरात विक्री करणा-या एकावर पोलीसांनी कारवाई केली. संशयिताच्या ताब्यातून सुमारे ३० किलो वजनाचे गोमांस जप्त करण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजूम बिस्मीला कुरेशी (५० रा.सात्विकनगर,पखालरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गोमांस विक्रेत्याचे नाव आहे. अंबड औद्योगीक वसाहतीत राजरोसपणे गोमासाची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस विक्रेत्यांचा माग काढत असतांनाच बुधवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास संशयिव संजीवनगर येथील न्यु स्टार बेकरी भागात असलेल्या एका खोलीत मांस विक्री करतांना मिळून आला.
संशयिताच्या ताब्यातून सुमारे चार हजार ५०० रूपये किमतीचे व ३० किलो वजनाचे मांस हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास हवालदार अहिरराव करीत आहेत.