नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी बुधवारी (दि.१६) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प व इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
कॉलेजरोड भागातील एका बांधकाम साईटवर वास्तव्यास असलेल्या दिपक उत्तम बांगरे (२९ मुळ रा. बुलढाणा हल्ली पारिजातनगर) या युवकाने अज्ञात कारणातून बुधवारी सकाळच्या सुमरास सदाशिवनगर येथील म्हाडा बिल्डींग परिसरात असलेल्या मोकळय़ा मैदानातील एका झाडास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ सतिश भांगरे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.
दुसरी घटना संसरी गावात घडली. गिरीश जनार्दन पाळदे (३६ रा.संसरीगाव दे.कॅम्प) यांनी बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. वडिल जनार्दन पाळदे यांनी त्यास तात्काळ कॅन्टोमेंट रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.