नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई एकलहरेरोडवरील अरिंगळे मळा भागात करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन मोहन बाबर (२४ रा.हॉटेल मोहिते समोर,अरिंगळे मळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. बाबर याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलीसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर व जिह्यातून त्यास एक वर्षासाठी तडिपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना सोमवारी (दि.१४) तो आपल्या घर परिसरात मिळून आला. याबाबत अमलदार भाऊसाहेब चत्तर यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.
५० वर्षीय इसमाने गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लहवित ता.जि.नाशिक येथील ५० वर्षीय इसमाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवाजी काशिनाथ बर्डे (रा.बाजगिरी,लहवित) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बर्डे यांंनी सोमवारी (दि.१४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. रूपाली राठोड यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.