नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा भागात उलट उत्तर दिल्याने दुचाकीस्वारांनी चालकास शिवीगाळ करीत कोयता मारून कारची काच फोडल्याची घटना घडली . या घटनेत कारचे नुकसान झाले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार शांताराम कुमावत (१९ रा.भगवती चौक,उत्तमनगर) व विठ्ठल आनंद मते (२१ रा.अल्को मार्केट सुमन पेट्रोल पंपाच्या बाजूला) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकीस्वारांचे नाव आहे. याबाबत पंकज जयवंत गोसावी (रा.यशवंतनगर,पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. गोसावी बुधवारी (दि.९) रात्री आपल्या मित्रांसमवेत पाथर्डी फाटा भागात गेले होते. रात्री अकरा वाजेच्या सुमारास ते इनोव्हाकार (एमएच १५ एफएफ ६८७५) मधून मित्र विशाल उर्फ कृष्णा पवार व राहूल माळी आदींसमवेत प्रवास करीत असतांना ही घटना घडली.
वक्रतुंड हॉस्पिटल रोडने ते कारमधून घराकडे जात असतांना वळणमावर यु टर्न घेत असतांना हॉर्न वाजविल्याने हा वाद झाला. पुढे दुचाकीवर डबलसिट जाणाºया एकाने त्यांना भाई आहे का असे संबोधले यावेळी कुमावत यांनी तू भाई आहेस का असे उलट उत्तर दिल्याने संतप्त दुचाकी चालकाने आपले वाहन थांबवून शिवीगाळ करीत कमरेचा कोयता काढून कारच्या उजव्या दरवाज्याची काच फोडली. या घटनेत सशयित दुकलीने कारमधील मित्रांना शिवीगाळ व दमदाटी करीत नुकसान केले असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.