नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) पार्किंगच्या वादातून एका कुटूंबियास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना तिडके कॉलनीत घडली. या घटनेत टोळक्याने लाथाबुक्यानी मारहाण केल्याने दाम्पत्यासह दोन मुले जखमी झाले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश गायकर, त्यांची पत्नी व अनोळखी सात ते आठ जण अशी कुटूंबियांस मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत उमेश रामअवतार जोशी (५४ रा.ग्रिनसिटी रो बंगलो,कोमल हाईटस समोर तिडके कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जोशी यांच्या मुलगा परिक्षीत याचा व संशयित प्रकाश गायकर याच्यात वाहन पार्क करण्याच्या कारणातून वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी (दि.८) रात्री एमएच १५ जी एक्स ९७०० या वाहनातून आलेल्या संशयितासह त्याची पत्नी व सात ते आठ जणांनी जोशी कुटुंबियांवर हल्ला केला.
ही घटना विजय गोपाल हाईटस समोर येथे घडली. सतप्त टोळक्याने शिवीगाळ करीत अचानक हल्ला चढविल्याने उमेश जोशी,त्यांची पत्नी मुलगा परिक्षीत जोशी व गिरीश आनंद आदी जखमी झाले असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.