नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हॉटेलमध्ये काम करणाºया ६१ वर्षीय वृध्देस इलेक्ट्रीक शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना नांदूरानाका भागातील शिवार हॉटेल येथे घडली. पाण्यात करंट उतरल्याने ही घटना घडली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गिताबाई आत्माराम पताडे (रा.आशिर्वाद लॉन्स ,शिवार हॉटेल शेजारी नांदूरनाका) असे मृत महिलेचे नाव आहे. पताडे या बुधवारी (दि.९) सकाळच्या सुमारास नेहमी प्रमाणे हॉटेलवर भांडी धुण्याच्या कामासाठी गेल्या असता ही घटना घडली.
आवारात त्या भांडी धुवत असतांना पाण्यात इलेक्ट्रीक करंट उतरल्याने त्यांना शॉक लागला होता. बेशुध्द अवस्थेत त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.