गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरदिवसा उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला….

by India Darpan
ऑक्टोबर 10, 2024 | 12:03 am
in क्राईम डायरी
0
crime 88

भरदिवसा उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरदिवसा उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना मेरी लिंकरोडवरील दत्तचौक भागात घडली असूनत्यात एक लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक लक्ष्मण चौधरी (रा.गणेश रो हाऊस,गजानन कॉलनी दत्तचौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चौधरी मंगळवारी (दि.८) दुपारी अल्पशाकामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख २६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.

वादातून चार जणांच्या टोळक्याने केला प्राणघातक हल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दांम्पत्यास मारहाण केल्याच्या वादातून चार जणांच्या टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडाळा पाथर्डी मार्गावर घडली. या घटनेत हॉकीस्टिकचा वापर करण्यात आल्याने ३२ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी आशिष दलोड,सिध्दार्थ दलोड,सिध्दांत दलोड व सनी हटवाल (रा.सर्व महालक्ष्मी चाळ,द्वारका) अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. याबाबत निखील कैलास निकाळे (रा.खुटवडनगर,कामटवाडे) यांनी फिर्याद दिली आहे. निकाळे मंगळवारी (दि.८) शालक सम्राट चंद्रशेखर गायकवाड (रा.पार्क साईड, वडाळा पाथर्डी रोड ) यांच्या घरी गेले होते. दोघे साला मेव्हणे सोसायटीच्या पार्किगमध्ये गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. हातात लाकडी हॉकीस्टीक घेवून आलेल्या संशयित टोळक्याने सम्राट गायकवाड यास शिवीगाळ करीत भाऊ आशिष दलोड व वहिणी शिलालेख यांना का मारहाण केली अशी कुरापत काढून त्यास लाथाबुक्यांनी व हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली. या घटनेत डोक्यात स्टीकने मारहाण करण्यात आल्याने गायकवाड गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृर्ती गंभीर आहे. अधिक तपास उफनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक…कपडे धुतले नाही या कारणातून पती व सासूने विवाहीतेवर केला विषप्रयोग…गुन्हा दाखल

Next Post

प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचे निधन…८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

India Darpan

Next Post
Ratan Tata

प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचे निधन…८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011