नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडी करणा-या रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना गंगापुर पोलीसांनी जेरबंद करुन त्यांचेकडुन ५ लाख ३६ हजार ७६० रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिणे हस्तगत केले.
या चोरी प्रकरणात भारत सखाराम खरात, वय ३२ वर्षे, रा. संतकबीरनगर, भोसला कॉलेजजवळ, नाशिक हल्ली रा. बेल्हेराजुरी, ता. जुन्नर, जि. पुणे व महेश बळीराम शिरसाठ, वय ३२ वर्षे, रा. मौलेहॉलजवळ, साईबाबा मंदिराजवळ, अशोकनगर, सातपुर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
जळगाव येथील भाऊराव हरी घाटे हे नाशिकमध्ये रक्षाबंधन सणानिमित्त भाच्याकडे मुक्कामी आले होते. त्यावेळेस त्यांचे सोन्याचांदीचे दागिने घरफोडी करुन चोरीला गेले होते. या प्रकरणी गंगापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर गंगापुर पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरु केला. आता महिना भरानंतर हे चोर सापडले आहे. ही घरफोडी करुन चोरी करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
गंगापुर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिल जुमडे, जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस निरीक्षक (गुन्हे)यासह पोलिसांनी गुन्हयाचा तपास केला.









