नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अल्पवयीन मुलीवर एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विवाहानंतर मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश ज्ञानेश्वर चौधरी (२३ रा. टाकळेगल्ली रामटेकडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे याबाबत पिडीत मुलगी व संशयित एकमेकांचे शेजारी असून त्यांच्यात प्रेमसंबध होते. गेल्या वर्षी दोघांनीही मंदिरात जावून विवाहही केला. याकाळात मुलगी गर्भवतीने राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. वैद्यकीय उपचारासाठी मुलगी मुंबईत गेली असता हा प्रकार समोर आला.
याप्रकरणी काश्मिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा आडगाव पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक योगीता पाटील करीत आहेत.