नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) मेळा आणि ठक्कर बाजार या बसस्थानक आवारात पार्क केलेल्या दुचाकी पळविणारा चोरटा पोलीसांच्या हाती लागला असून, त्याच्या ताब्यातून सुमारे साडे तीन लाख रूपये किमतीच्या आठ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून तो गेल्या काही दिवसांपासून मुंबईनाका पोलीसांना गुंगारा देत होता.
जाकिर अक्तार शेख (४० रा. इस्माईल बेकरी जवळ,खडकाळी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. युनिटचे हवालदार प्रशांत मरकड व प्रदिप म्हसदे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. टीव्हीएस मॅक्स १०० ही चोरीच्या मोटारसायकल घेवून चोरटा सीबीएसकडून कॅनडा कॉर्नरच्या दिशेने जाणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस ग्राऊंड भागात पथकाने सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळ््यात अडकला. त्याच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याची तसेच मेळा व ठक्कर बाजार बसस्थानक आवारातून अजून सात
मोटारसायकली चोरी केल्याची त्याने कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून ३ लाख ६० हजार रूपये किमतीच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहे. दरम्यान संशयित दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुह्यात पसार असल्याचे पोलीस अभिलेखावरून आढळून आले आहे. ही कारवाई आयुक्त संदिप मिटके, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदिप मिटके व युनिटचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदाम सांगे, हवालदार प्रविण वाघमारे, विशाल काठे नाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलींदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, उत्तम पवार, रविंद्र आढाव, अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे व समाधान पवार आदींच्या पथकाने केली.
……….