नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्नीच्या पैश्यांवर पतीने डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. घरातील पर्स मधून पतीने तब्बल अडिच लाख रूपये परस्पर काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हैदरअली खान उर्फ तेजस अनिल गांगुर्डे (रा.देवळालीगाव राजवाडा, इंद्रविकासनगर,वालदेवी पुलाजवळ) असे पत्नीच्या पैश्यांवर डल्ला मारणा-या पतीचे नाव आहे. याबाबत मुस्कान खान यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना गेल्या बुधवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. घरात कुणी नसतांना संशयित पतीने खान यांच्या पर्समधील २ लाख ४० हजार रूपयांची रोकड परस्पर काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.