नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर कॉलनी येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १७ लाख रूपयांच्या रोकडवर डल्ला मारला. त्यात सेवानिवृत्तीच्या रकमेसह वडिलोपार्जीत हिस्यात मिळालेल्या रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुमारसिंग मगणसिंग परदेशी ( रा. एमएचबी कॉलनी समतानगर सातपूर कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. परदेशी कुटुंबिय २४ ते २८ सप्टेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमधील लोखंडी कपाटात ठेवलेली सेवानिवृत्तीची रक्कम, तसेच शेती आणि वडिलोपार्जीत हश्यात मिळालेली अशी सुमारे १६ लाख ७५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक राहूल नळकांडे करीत आहेत.