नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फिक्स डिपॉझीट करण्यासाठी बँकेत गेलेल्या वृध्दाची ३७ हजाराची रोकड भामट्यांनी हातोहात लांबविली. मदतीचा बहाणा करून दोघा अनोळखी तरूणांनी ही रक्कम लांबविली असून हा प्रकार कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्कट भागात घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूण मणीलाल अहिरे (६२ रा.महाले मळा सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सलून व्यावसायीक असलेले अहिरे गुरूवारी (दि.२५) दुपारी कॅनडा कॉर्नर भागातील कर्नाटक बँकेत काही रक्कम फिक्स डिपॉझीट करण्यासाठी गेले असता ही घटना घडली.
एक लाख ६० हजार रूपयांची रक्कम कॅश काऊंटरवर भरण्यापूर्वी ते डिपॉझीट स्लीप भरीत असतांना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. यावेळी संशयीतानी मदतीचा बहाणा करून पैसे मोजण्यास भाग पाडत अहिरे यांच्या रकमेतील सुमारे ३७ हजार रूपये हातोहात लांबविले. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.