नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सोशल मिडीयावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारणे एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. अश्लिल चॅटींग करीत नराधमाने महिलेचा विनयभंग केला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरीरोडवरील निसर्गनगर भागात राहणा-या पिडीतेने याबाबत फिर्याद दिली आहे. फेसबुक या सोशल साईटवर महिलेस एका अनोळखी व्यक्तीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. महिलेने ती स्विकारली असता ही घटना घडली. संशयिताने वेळोवेळी चॅटींगच्या माध्यमातून महिलेशी आॅनाईन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्यास दाद न दिल्याने संशयिताने बुधवारी (दि.२४) पुन्हा आॅनलाईन चॅटींग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने अश्लिल चॅटींग करीत विनयभंग केला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक चितामण करीत आहेत.
……….