नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात असलेल्या एका मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली. या घटनेत गेल्या दोन महिन्यापासून जमा असलेली रोकड भामट्यांनी लांबविली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदकिशोर बाबुराव घुमरे (रा.आहिल्याबाई होळकर चौक शिवाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. घुमरे शिवाजीनगर येथील अहिल्याबाई चौकात असलेल्या कुबेर भंडारी महादेव मंदिरात सेवा करतात.
शनिवारी (दि.५) रात्री ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी कुबेर महादेव मंदिरातील दान पेटीचे कुलूप तोडून सुमारे दोन महिन्यांपासून जमा असलेली रोकड चोरून नेली. या दान पेटीत १५ ते २० हजाराची रोकड असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.