पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : सहकारनगर पोलीस स्टेशन येथे एकूण १६ बिनधनी दुचाकी वाहने जप्त करण्यात आलेली असून, सदर वाहनांच्या आर.टी.ओ. नोंदीप्रमाणे संबंधित पत्त्यावर समजपत्र पाठविण्यात आले आहे. तसेच शोध घेतला असता, आजतागायत कोणतेही मालक संपर्कात आलेले नाहीत.
सदर १६ बिनधनी वाहने सहकारनगर पोलीस स्टेशन येथे पडून असून, त्यांची शासकीय लिलाव प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे वाहनांचे मालक असतील त्यांनी सात दिवसांच्या आत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून गाडीची आवश्यक कागदपत्रे सादर करून वाहने ताब्यात घ्यावीत. अन्यथा, निर्धारित मुदतीनंतर सदर वाहनांचा शासकीय लिलाव करण्यात येईल, याची संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.