नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंक अकड्यावर पैसे लावून टाईम डे व डे मिलन मटका जुगार खेळणा-या व खेळविणा-या तीन जुगारीना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई लाखलगाव चौफुली भागात करण्यात आली. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य हत्यगत करण्यात आले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय जयराम कापसे (रा.कोळवाडा,लाखलगाव), मंगेश राजू पवार (रा.गौंडवाडी फुलेनगर) व रविंद्र गेंदा अहिरे (रा.दत्तनगर पेठरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. लाखलगाव चौफुली परिसरातील हॉटेल तन्मय शेजारील पत्र्याच्या शेड खाली काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२२) सायंकाळी पथकाने धाव घेत ही कारवाई केली.
संशयित अंक अकड्यावर पैसे लावून टाईम डे व डे मिलन मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार गोसावी यांनी दिलेल्या फिर्यावरून पोलीस दप्तरी महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.