नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत ३३ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना ग्रामदैवत कालिका मंदिर भागातील बिझनेस प्लस या इमारत परिसरातील घडली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार धार्मिक चंद्रकांत परमार (रा.परिमल पार्क हिरावाडीरोड शिवमनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. परमार कालिका मंदिर भागातील बिझनेस प्लस या इमारतीत असलेल्या ओमीज सोल्युशन येथे कामास होता. सोमवारी (दि.२२) तो नेहमी प्रमाणे कामात गेला होता.
सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून त्याने इमारतीच्या टेरेसवरून जमिनीवर झोकून दिले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भोये करीत आहेत.