नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुह्यांची नोंद करण्यात आली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सिडकोतील योगेश मधुकर भावसार (रा.गणेश चौक, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भावसार यांची अॅक्टीव्हा एमएच १५ डीवाय ८९५१ गेल्या २६ जुलै रोजी रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
दुसरी घटना शिंदेगावात घडली. सुनिल दादा बोराडे (रा.सप्तशृंगीनगर शिदे ता.जि.नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बोराडे याची स्प्लेंडर एमएच १५ सीई ८०४२ गेल्या बुधवारी (दि.१७) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधित तपास हवालदार पाटील करीत आहेत.