नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ओमकारनगर येथील एका इमारतीतून चोरट्यांनी लिफ्टच्या बॅट-या चोरून नेल्या. या घटनेत सुमारे १६ हजार रूपये किमतीच्या दोन बॅट-यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र महारू काटकर (रा.आदित्य प्राईड,ओमकारनगर म्हसरूळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. काटकर वास्तव्यास असलेल्या आदित्य प्राईड या बिल्डींगमध्ये ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यानी शुक्रवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास वरच्या मजल्यावर ठेवलेल्या लिफ्टच्या दोन बॅट-या चोरून नेल्या. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.