नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शरिर सुखाची मागणी करीत एकाने महिलेच्या मोबाईलवर अश्लिल फोटो, व्हिडीओ व संदेश पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. सलग चार महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ संजय देशमुख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत आनंदवली भागात राहणा-या पीडितेने फिर्याद दिली आहे. पिडीता व संशयित एकमेकांचे परिचीत असून संशयिताने महिलेचा मोबाईल नंबर मिळवित हे कृत्य केले आहे. २७ मे ते १५ सप्टेंबर दरम्यान संशयिताने महिलेशी जवळीक साधत शरिर सुखाची मागणी केली.
महिलेने त्यास नकार देत समजून सांगितले असता त्याने मोबाईलवर स्व:ताचे अश्लिल फोटो, व्हिडीओ आणि संदेश पाठवून विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.