नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दुमजली माडीचे कौले कढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर डल्ला मारला. ही घटना जाखोरी ता.जि.नाशिक येथे घडली. या घटनेत ४१ हजाराच्या ऐवज भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाराम संतू सोनवणे (रा.दत्तमंदिर चौक, जाखोरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे कुटुंबिय ९ ते १४ सप्टेंबर दरम्यान बाहेर गावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी सोनवणे यांच्या दुमजली माडीवर चढून कौले काढून घरफोडी केली. घरात शिरलेल्या भामट्यांनी कपाटातील रोकड व सोन्याचे मंगळसुत्र असा ४१ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.