नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,अंबड, नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ढिकलेनगर येथील ऋषीकेश संजीव ठाकूर (रा.श्री काळाराम मंदिराजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शनिवारी (दि.६) दुपारच्या सुमारास गणेशवाडी भागात गेले होते. आयुर्वेदीक कॉलेज जवळ लावलेली त्यांची प्लेझर एमएच १५ सीयू ३९६० चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार सुनिल शेवाळे करीत आहेत.
दुसरा प्रकार सिडकोतील अंबड त्रिमुर्ती लिंकरोड भागात घडली. याबाबत प्रशांत योगेश बरकले (रा.कुटे ड्रायव्हींग स्कूल जवळ,) यांनी फिर्याद दिली आहे. बरकले यांची पल्सर एमएच १५ एफडब्ल्यू ९९०९ रविवारी (दि.१४) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
तिसरी घटना जेलरोड भागात घडली. संतोषकुमार लालुराम यादव (रा.लोखंडेमळा, हनुमंतनगर जेलरोड) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. यादव यांची स्प्लेंडर एमएच १५ जीजे ८४९९ गेल्या मंगळवारी (दि.९) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यानी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
चौथी याच परिसरातील करन्सी नोट प्रेस भागात घडली. प्रविण सुपडू वाणी (रा.पंचतरमी हौ.सोसा.कॅनलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाणी गेल्या बुधवारी (दि.३) सकाळच्या सुमारास नोटप्रेस भागात गेले होते. परिसरात पार्क केलेली त्यांची प्लेझर एमएच १५ सीयू ८८०५ चोरट्यांनी पळवून नेली. तर रामदास संपत वलवे (रा.गंगापाडळी ता.जि.नाशिक) हे गेल्या ३१ ऑगष्ट रोजी दुपारी बिटको हॉस्पिटल भागात गेले होते. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची पॅशन एमएच १५ एफई ३२१० मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार शेख व गायकवाड करीत आहेत.