नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शालिमार येथील संदर्भ रूग्णालय परिसरात आजारी पत्नीस चहा घेण्यासाठी जाणा-या ५३ वर्षीय इसमास रिक्षातून आलेल्या त्रिकुटाने लुटल्याची घटना घडली. या घटनेत भामट्यांनी सदर व्यक्तीस पकडून ठेवत खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पोपट डांगळे (रा.पिंपळस रामाचे ता.निफाड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डांगळे यांच्या पत्नीवर संदर्भ रूग्णालयात उपचार सुरू असून रविवारी (दि.६) सकाळी आजारी पत्नीस चहा घेण्यासाठी हॉस्पिटल बाहेर पडले असता ही घटना घडली. प्रवेशद्वाराकडून ते देवी मंदिराच्या दिशेने पायी जात असतांना समोरून एमएच १५ बी २२८६ या रिक्षातून आलेल्या तिघांनी त्यांना पकडून ही जबरी चोरी केली.
दोघांनी पकडून ठेवत तर एकाने बळजबरीने खिशात ठेवलेला मोबाईल काढून घेत पोबारा केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साबळे करीत आहेत.