नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना पंचवटीतील मजूरवाडी भागात घडली होती. गेल्या अनेक दिवसांपासून महिलेवर उपचार सुरू होते. याप्रकरणी पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चमेलीबाई अनंत म्हात्रे (रा.घर नं.१३.मजूरवाडी,श्रीराम विद्यालयाजवळ पंचवटी) असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे. म्हात्रे या गेल्या मंगळवारी (दि.२) सकाळच्या सुमारास घरकाम करीत असतांना ही घटना घडली होती. स्टोव्हचा अचानक भडका उडाल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या.
मुलगा संतोष म्हात्रे यानी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी (दि.१२) उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.