नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कर्जाच्या वसूलीसाठी महिलेस अश्लिल शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार तिने खासगी फायनान्स कंपनी कडून कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या वसूलीसाठी फायनान्स कंपनीकच्या कर्मचा-यांकडून शुक्रवारी (दि.२९) महिलेशी संपर्क साधण्यात आला. वेगवेगळया मोबाईल नंबरवरून संपर्क साधणा-या पुरूषाने महिलेशी अश्लिल संवाद साधला.
यावेळी कर्ज भरले नाही तर घरी येवून कपडे फाडू व समाजात बदनामी करू अशी धमकी दिली. याप्रकरणी महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक मयुरी तुरे करीत आहेत.