नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मैत्रीणीस धक्काबुक्की केल्याचा जाब विचारल्याने संतप्त युवकाने तरूणीस मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याची घटना जयभवानीरोड भागातील फर्नांडीस वाडीत घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम धेनवाल (रा.फर्नांडीसवाडी,जयभवानीरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता तिची बहिण व मैत्रीण शनिवारी (दि.५) रात्री धोंगडेनगर भागात दांडीया रास खेळण्यासाठी गेल्या होत्या. या ठिकाणी संशयिताने पीडितेच्या मैत्रीणीशी झालेल्या जुन्या वादाची कुरापत काढून तिला शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
यावेळी पीडितेने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तोंडावर व पोटात लाथ मारून युवतीचा विनयभंग केला. या घटनेत पीडितेच्या बहिणीसही संशयिताने शिवीगाळ करीत मारहाण केली असून अधिक तपास जमादार शेजवळ करीत आहेत.