नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मॉलमधील गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील सोन्याचे टॉप्स असलेली डबी चोरून नेली. या डबीत सुमारे ४० हजार रूपये किमतीचे कानातील टॉप्स होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिला मुनाफ सौदागर (रा.लाखलगाव ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. सौदागर या बुधवारी (दि.४) मुलीस सोबत घेवून शहरात आल्या होत्या. मनोरोड भागातील बॉम्बे मेकअप बाजार येथे खरेदी करीत असतांना ही घटना घडली. मॉलमध्ये असलेल्या गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीची चैन उघडून ही चोरी केली. पिशवीत ठेवलेली सोन्याचे टॉप्स असलेली डबी भामट्यांनी हातोहात लांबविली असून अधिक तपास हवालदार जुंद्रे करीत आहेत.
४० हजाराची सोन्याची पोत भामट्यांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिगारेट घेण्याच्या बहाण्याने किराणा दुकानात आलेल्या भामट्यांनी व्यावसायीक महिलेची पोत हिसकावून नेल्याची घटना माडसांगवी (ता.जि.नाशिक) येथे घडली. या घटनेत ४० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत भामट्यांनी लांबविली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौशल्या जनार्दन शिंदे (६३ रा. माडसांगवी ता.जि.नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे यांचे माडसांगवी गावात कृष्णा साई नावाचे किराणा दुकान असून मंगळवारी (दि.३) सायंकाळी त्या आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. दुचाकीवर डबलसिट आलेल्या दोघांपैकी एकाने दुकानात येवून सिगारेटची मागणी केल्याने शिदे या सिगारेटच्या पाकिटातून सिगारेट देत असतांना भामट्याने त्यांच्या गळ््यातील सुमारे ४० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर बसून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक मयुर निकम करीत आहेत.