नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून सोमवारी (दि.२५) वेगवेगळया भागात राहणा-या मुलीसह एका विवाहीतेचा विनयभंग करण्यात आला. परिचीतांकडून हे प्रकार घडले असून याप्रकरणी सरकारवाडा व सातपूर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
शरणपूर रोडवरील मिशन मळा भागात राहणारी युवती सोमवारी सकाळच्या सुमारास दुध घेण्यासाठी परिसरातील किराणा दुकानात गेली असता ही घटना घडली. सतिश मनोज अलस्मराव (३१ रा.शरणपूररोड) या संशयिताने तरूणीचा वाट अडवित विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. कडेपठार चौकात राहणा-या विवाहीतेने याबाबत फिर्याद दिली आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास पिडीतेने आपल्या शेजाºयांच्या घरात मोबाईल चार्जींगला लावला असता ही घटना घडली. साडे तीन वाजेच्या सुमारास चार्जींगला लावलेला मोबाईल घेण्यासाठी महिला शेजारी गेली असता कपील खैरणार (४२) नामक संशयिताने तिचा विनयभंग केला. घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने प्रेमाची मागणी करीत हे कृत्य केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.