नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कच्चा माल खरेदी विक्री व्यवहारात दोघांनी एका व्यावसायीकास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. उधारीवर घेतलेल्या मालाची परतफेड दीड वर्ष उलटूनही केली नसल्याने व्यावसायीकाने पोलीसात धाव घेतली आहे. या व्यवहारात व्यावसायीकास साडे तीन लाख रूपयांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश शेजपाल व बनकिम शेजपाल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मयुर अधिकराव पाटील (रा.गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांची गोविंदनगर येथील आरडी सर्कल भागात श्री टेंडर्स नावाची फर्म आहे. संशयितांनी रासबन ट्रेंडर्स कंपनीच्या नावे पाटील याच्याकडून अल्युमिनीअमचा कच्चा माल, लॅचेस व अन्य मालाची खरेदी केली होती.
डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ या कालावधीत संशयितांनी रोखीत व उधारीत बहुतांश वेळा माल उचलल्याने शेजपाल यांच्या रासबन ट्रेंडर्स कंपनीला उधारीत माल पुरवण्यात आला होता. मात्र दिड वर्ष उलटूनही संशयिताने पैसेही दिले नाही व मालही परत केला नाही. त्यामुळे पाटील यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.
…….