नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– संत चार्वाक चौक परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यानी सुमारे ११ लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र भास्कर भाटे (रा. सुखवास्तू, शक्तीधाम अपा.महारूद्र कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. भाटे कुटुंबिय २१ ते ३० जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लॅचलॉक तोडून ही चोरी केली.
घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली सुमारे १० लाख ५७ हजार ७०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.