इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात अनेक बाबी निष्पन्न झाल्या आहेत. प्रेमसंबंधातून एका महिलेच्या पतीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास पोलिस करीत आहेत.
वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढेगाव अस्वली रोडलगत असलेल्या गरुडेश्वर शिवारात खून झाला आहे. याप्रकरणी शांताबाई मधू मुकणे यांनी तक्रार दिली आहे. त्या मूळच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी येथील रहिवासी आहेत, मात्र त्या सध्या घोटीजवळील वांगेवाडी जवळील वीटभट्टीवर काम करतात. त्यांच्यासोबत मुलगा संपत मुकणे हा सुद्धा राहतो. हे दोघेही वीटभट्टीवर रोजंदारीने काम करतात.
संपतच्या पत्नीचे घोटी येथील शंकर वळवी या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळेच शंकर आणि संपतची पत्नी हे पळून गेले होते. त्यामुळे संपतने शंकर यास याविषयी विचारणा करायचा. मात्र शंकर हा संपत मुकणे यास वारंवार उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. दरम्यान, शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शंकर आणि संपत हे वीटभट्टीवर होते. त्यावेळी शंकरने त्याचा भाऊ बुधा रतन वळवी याच्या मदतीने संपतला बेदम मारहाण करण्यास प्रारंभ केला. संपतने विरोध केला असता दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
दोन्ही भावांनी संपतला गरुडेश्वर शिवारात मरिमाता मंदिरालगत फेकून दिले. या मारहाणीत संपत हा गंभीर जखमी झाला. तसेच, रात्रीची वेळ असल्याने कुणीही मदतीला आले नाही. तसेच, वेळेवर उपचारही मिळाली नाहीत. त्यामुळे संपतचा मृत्यू झाला. अखेर सकाळच्या सुमारास याठिकाणाहून जाणाऱ्या काही ग्रामस्थांना कुणीतरी बेशुद्ध पडलेले असल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपतला रुग्णालयात नेले. पण, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.
Nashik Crime Murder Police Vadivarhe