नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर परिसरात गेल्या आठवडाभरापासून हत्यांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (२८ मे) मध्यरात्रीही नाशिकमध्ये एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. आठवड्याभरातील हा सहावा खुन आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम संबंधावरून झालेल्या वादात उडी घेतल्यामुळे वडाळा रोडवरील शिवाजी वाडी येथे खुन झाला आहे. झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या हाणामारीत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. घाव वर्मी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. सागर प्रकाश रावतर (वय २०) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहेत. हे तिघेही सख्ख्ये-चुलत भावंड आहेत. गौतम भोये, गणेश भोये, भरत भोये अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
नाशक शहरात या आठवड्यामध्ये खुनाचे सत्र सुरू आहे. म्हसरुळ, गंगापूररोड, द्वारका, माडसांगवी या भागात खुन झाले आहेत. या सर्व पोलिसांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. किरकोळ किंवा विविध कारणांमुळे हत्या होत असल्या तरी शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.