नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरात घूसून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना प्रबुद्ध नगर भागात घडली. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार संशयितास अटक करण्यात आली असून याप्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चारोस्कर असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित आणि पिडीता एकाच भागातील रहिवाशी असून मंगळवारी (१६ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पंधरा वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून संशयिताने हे क्रूत्य केले. घरात घूसून संशयिताने बळजबरीने बलात्कार केला. कुटूंबिय घरी परतल्यावर मुलीने आपल्या आई कडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला असून पोलिसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे.
Nashik Crime Minor Girl Rape Suspected Arrested
Satpur