नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने रागाच्या भरात पतीला अतिशय बेदम मारहाण केली. या निघृण कृत्यात पत्नीच्या डोके, चेहरा, हनुवटी अतिशय गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पतीनेच पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून पत्नीला मृत घोषित केले. या हत्येचा उलगचा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव आरती विशाल कापसे (वय २४, रा. माळवाडा, माडसांगवी) असे आहे. सोमवारी (१६ मे) रात्री ११ वाजेच्या सुमारास आरती आणि तिचा पती विशाल यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यात विशाल अतिशय संतापला. त्यामुळे त्याने पत्नी आरतीला अतिशय बेदम मारहाण केली. विशालने पत्नीवर थेट लाकडी फावड्यानेच हल्ला चढविला. ही मारहाण एवढी जबर होती की आरतीच्या डोके, चेहरा, हनुवटीला गंभीर दुखापत झाली. आरती बेशुद्ध झाल्याचे विशालच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने तिला त्र्यंबकरोडवरील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला पासून मृत घोषित केले. याप्रकरणी लता रामू जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित पती विशाल राजाराम कापसे, सुरेश राजाराम कापसे, निवृत्ती शंकर कापसे, शोभा उर्फ अलका निवृत्ती कापसे, बंटी निवृत्ती कापसे यांच्याविरोधात आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.