नाशिक – एकतर्फी प्रेमातून एकाने पाठलाग करून लग्नाची गळ घालीत तरूणीचा विनयभंग केल्याची घटना मुंबईनाका ते काठे गल्ली सिग्नल दरम्यान घडली. याप्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे.
मयुर दिलीप आहेर (२३ रा.भैरवनाथ नगर,चांदवड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पिडीत तरूणी आणि संशयीत एकमेकांचे परिचीत असून,गुरूवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास मुंबईनाक्याकडून काठे गल्ली सिग्नलच्या दिशेने जात असतांना संशयीताने पाठलाग करीत तिची वाट अडविली.
नागजी सिग्नल परिसरातील चिकन दुकाना नजीक संशयीताने फोन का उचलत नाही या कारणातून जाब विचारत युवतीस मारहाण केली. यावेळी तरूणीने येथून निघून जा असे म्हटल्याने संशयीताने एकतर्फी प्रेमातून लग्न करणार आहे की नाही ते सांग तूला आज जिवंत सोडत नाही असे म्हणून डिझेलने भरलेली बाटली स्व:तासह तरूणीच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.